लिहू का नको असं किती वेळ गोंधळ चाल्लय. आणि आता लिहिण्याशिवायाचा पर्याय नाही.
एखाद्या कागदावर चित्र काढायला सुरुवात करावी आणि अनेकदा चित्र बनता बनता काहीतरी चुकून खोडायला लागावा आणि सारं शुभ्र स्वच्छ कागद काळसर, खराब व्हावा आणि नवीन चित्राच्या प्रत्येक प्रयत्नाला अगोदरच एक मळभलाभावं असं झालाय.
का व्हावा असं संवादांच? संवादाला शांत, स्थिर आणि आश्वस्त रूप येईल असं वाटतानाच एकदम असे भोवरे का यावेत? आणि मग त्या न जमणार्या संवादासाठी बाकी सारं सूर हरवल्यागत का वाटावं मला? मी माझाच आहे न, मग हे न उलगडणारा गणित का? हा प्रश्न नाहीये तुला, ऐक फक्त.
खूप काही घडलंय ना अगोदर आणि म्हणून तू आता या क्षणी जाणवत नाहीयेस ह्यानेही तुटून जायला होत नाहीये. एक समतोल साधणारा निर्विकारपणा यायला लागलाय, ज्यात सगळंच हळूहळू समान आपलं आणि समान तटस्थ वाटतं. मला आवडत नाही हा असला शांत समतोल, तोल असावा ज्यात परस्पर विरोधी ताण आहे म्हणूनच आयुष्य स्थिर व्हावा.
पण असं होणारच होतं न. मग शांत राहू? तुझ्यापर्यंत हे काहीही पोचू न देता? तुलाही जे समजतंय त्यावर परस्पर संमतीच्या मौनाचं पांघरूण घालू?
आवेग अजूनही इतका आहे माझ्यात कि तू अशी अबोल, अस्पष्ट झालीस तर समोरच येईन तुझ्या आणि शब्दाने नाही तर त्यापलीकडच्या शरीराच्या आणि सोबत जाणवणाऱ्या एकमेकांच्या निखळ अस्तित्वाच्या संवादानेच सांगेन तुला, कि पोचलीस आहेस तू आता माझ्या शब्दात एवढी, तू त्यातून बाहेर जाण म्हणजे माझ्या शब्दांना अस्ताच्या तीराशी ठेवणं. का जातीयेस?
काहीही म्हण ह्याला... insecurity म्हण किंवा स्वार्थीपणा म्हण. गृहीतच धरतो आहे तुला, आणि सांग तुलाही हवंच होतं न हे कुठेतरी?
तरीही सांगू, बरोबरच असेल हे , ह्यातूनच परत केव्हातरी संवादाच्या नव्या आणि अजून गहिर्या आयामाशी येऊन पोचू. तुझ्यापाशी माझा संवादाची सोबत शोधायचा प्रवास संपलाय. आता एकटा असलो तरी त्यालाही किती समृद्ध केलयस तू.
आता शांतता आहे एक, ह्या शब्दांना माझ्यातून बाहेर ठेवून पाहतोय त्यांच्याकडे. थोड्या वेळाने ते माझे नसतील आणि ते तुला केव्हा समजतील कुणास ठाऊक
माझा आवेग, माझी शांततेची तितकीच गहिरी ओढ आणि त्यातून माझाच माझ्याशी दुरावा , आणि तूही तशीच, आलीस, एकांताच्या आवर्तात दूरच पण माझं चांदणं झालीस, चाललीयेस, तेही अनिश्चिततेच्या आवर्ताचे संकेत जिवंत ठेवून...
अशीच राहा, अशीच तहान राहो, ज्यानं तुझ्या येण्याचा बहर गात्रागात्राने भोगता येईल आणि ह्या एकांतालाही एक मृदू पालवी राहील....
Friday, March 12, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment